100% FREE Shipping all across India

गुढीपाडवा

गुढीपाडवा

नव्या व्यवस्थेचा आरंभ करण्याचा दिवस म्हणजे पाडवा. एक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात या दिवसाला ‘पाडवा, असे म्हणतात. कोणतेही शुभकार्य करण्याकरिता या दिवशी सुरूवात करावी. इतर दिवसांसारखे या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते. मान्यतेनुसार साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो!

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. या दिवसापासून पुन्हा देव, ऋषी, पितर, मनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचा, त्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचा, हाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.

या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.वसंत ऋतुचं आगमन या दिवसापासुन होतं. नव्या शालिवाहन संवत्सराला या दिवसापासुन सुरूवात होते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या प्रतिष्ठानांचे उद्घाटन केले जाते. सोन्याची खरेदी, नव्या वास्तुत गृहप्रवेश, व्यवसायाला प्रारंभ अशा महत्वाच्या गोष्टींसाठी गुढीपाडवा या दिवशी सुरूवात केली जाते.

शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला. पुराणात लिहुन ठेवल्यानुसार एका शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्याकरता सहा हजार मातिचे पुतळे बनविले आणि त्यात प्राण फुंकले. यांच्या सहाय्याने शंकराचा पराभव करण्यात आला. शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू होण्याची परंपरा तेव्हांपासुनच सुरू झाली. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

देवी पार्वतीचा आणि महादेवाचा विवाह पाडव्याच्याच दिवशी ठरला असल्याची देखील कथा आहे. पाडव्यापासुन लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आणि तृतियेला त्यांचा विवाह संपन्न झाला. पाडव्याच्या दिवशी देवी पार्वतीची आदिशक्तीची पुजा करण्याची देखील प्रथा आहे. त्याला चैत्र नवरात्र देखील म्हणतात. विवाहानंतर देवी पार्वती महिन्याभरा करिता माहेरी येते. तिचा कौतुक सोहळा म्हणुन हळदीकुंकु आयोजित केले जाते. देवी पार्वती अक्षयतृतियेला सासरी निघते.
गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून तिची पूजा करतात.

प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपवुन रावणासारख्या बलाढय शत्रुचा आणि इतर राक्षसांचा पराभव केला व आजच्याच दिवशी अयोध्येला परतले. त्यांच्या आगमना प्रित्यर्थ तसेच रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून अयोध्यावासीयांनी घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.

गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभी करण्याची परंपरा आहे. शुभशकुनाच्या या गुढीत एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल), गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते. या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते, तिच्याकरता पाट मांडला जातो, गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो, निराजंन उदबत्ती लावुन औक्षण केले जाते. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते. गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते. अशा प्रकारे गुढीला लावलेल्या वस्त्राप्रमाणे त्यातून आवश्यकतेनुसार शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या लहरी प्रक्षेपित होऊन सर्वांनाच लाभ होतो. गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात.
गुढीपाडव्याला गुढी उभारून झाली की घरातील सगळे एकत्र जमतात. छान पारंपारीक वेशात सर्वजण नटलेले असतात. घरात गोडाधोडाचे जेवण असते. खास करून श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळी हे दोन पदार्थ तर हमखास जेवणात दिसतात. पाहुणे सोयरे येतात आणि एकत्र कुटुंब जेवणाचा आस्वाद घेतात.
मराठी, कोंकणी, कानडी आणि तेलगु भाषीक समाज हा गुढीपाडवा उत्सव साजरा करतात. सिंधी लोकं देखील याच दिवशी चेटीचंड नावाचा सण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून साजरा करतात. गौतमीपुत्राची सत्ता असलेली राज्य कर्नाटक व आंध्रप्रदेश मधे स्वातंत्र्यप्राप्तीचा आनंद साजरा करण्याकरता या दिवशी संवत्सर पाडवो व उगादी (Ugadi) या निराळया नावांनी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.

मराठी साहित्यापैकी अहिराणी भाषेतील कवितांमुळे प्रसिध्द असलेल्या बहिणाबाईंची गुढीपाडवा सणावरील खालील काव्यरचना किती सुगम आहे पहा :
गुढीपाडव्याचा सण, आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं, सोडा मनांतली आढी
गेल सालीं गेली आढी, आतां पाडवा पाडवा,
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा.

सण, उत्सव आणि व्रते यांना अध्यात्मशास्त्रीय आधार असल्याने ते साजरे करतांना त्यांतून चैतन्यनिर्मिती होते अन् त्यायोगे अगदी सर्वसामान्य मनुष्यालाही ईश्वराकडे जाण्यास साहाय्य होते.

गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणा-या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणा-या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात.

 ---------------------------------------------------------------------------------------------------------

Gudipadva!

Padva is the day to start a new system. Chaitra Shuddha Pratipada, the first day of re-creation after an annual cataclysm, is called Padva. To do any good deed should start this day. There is no need to look at the muhurat on this day like other days. This day, which is considered to be one of the three and a half moments according to tradition, is celebrated as Gudipadva!

Gudipadva, Akshayya-Tritiya and Dussehra each have one and a half Kartik Shuddha Pratipada which is Shubha Tithi or Muhurta. The characteristic of these three and a half muhurats is that one has to watch the muhurat for any good deed on other days; On this day, however, the muhurat does not have to be seen. Any hour of the day is auspicious.

God created the universe, that is, the Satyayuga began, since it is the day on which the year begins. From this day onwards, the main purpose of celebrating Padva is to start worshiping God, sage, pitar, man and ghost again, to get their blessings and to start doing one's duty.

The weather is temperate and uplifting at this time. In winter, the leaves of the trees fall off, while around Padva, the trees get new leaves. The trees seem to be blooming. Spring is coming from this day. The new Shalivahan year starts from this day. New establishments are inaugurated on the auspicious occasion of Gudipadva. Gudipadva is started on this day for important things like buying gold, moving into a new house, starting a business.

Gudipadva is also the day when the Sakas defeated the Hunas and won. From this day onwards Shalivahan Shak started; Because on this day Shalivahana defeated the enemy. According to the Puranas, a potter named Shalivahan made six thousand clay statues to defeat the Sakas and breathed life into them. With the help of this, Shankara was defeated. The tradition of starting a new chronology in the name of King Shalivahan started from that time. King Shalivahan is still important today as the first Maharashtrian king to start Saka. On this day, it is customary to welcome the Hindu New Year by reciting the Panchag and worshiping Goddess Saraswati.

There is also a story that Goddess Parvati and Mahadev got married on the day of Padva. Preparations for the wedding started from Padva and their marriage was consummated on the third day. It is also customary to worship Goddess Parvati on the day of Padva. It is also called Chaitra Navratra. After marriage, Goddess Parvati comes for a month. Haldikunku is organized as her appreciation ceremony. Goddess Parvati goes to Akshay Tritiya.

One of the reasons for celebrating Gudipadva is also found in the Mahabharata. According to this, in the Adiparva of the Mahabharata, a king named Uparichar planted the stick of Kalka which he got through Indra in the ground as a bow to Indra and worshiped that stick the next day. This day was the first day of the new year. In honor of this tradition, other kings also worship the stick by dressing it like a shell.

Lord Ramachandra, after fourteen years of exile, defeated a formidable enemy like Ravana and other demons and returned to Ayodhya on this very day. Gudi (Brahmadhvaj) was erected from house to house by the people of Ayodhya as a symbol of Rama's victory and happiness in return for his arrival. The symbol of victory is high, so Gudi is raised high.

On the day of Gudipadva, Hindu society has a tradition of erecting Gudi at the door of one's house. Gudi is considered an auspicious symbol of victory, prosperity and positivity.

Gudipadva has a tradition of erecting Gudi at home. The Gudi is decorated with a clean stick, new clothes (sari, blouse, handkerchief), knots, mango leaves, neem leaves, marigold flower garland, copper metal lota. Rangoli and other decorations are made around this Gudi, a pot is laid for it, an offering of sweet dhoda is shown, and axing is done with Nirajan Udbatti. In the evening, before sunset, Gudi is unloaded by carrying turmeric. Gudi is the victor. Gudi is erected at every level of the battle to show that the gods have already won the battle of Devasur and at every level due to the success of the six virtues of the gods. In this way, like a garment worn on a Gudi, waves of strength, emotion, consciousness, joy and peace are projected from it as per the need and benefit everyone. Brahma is worshiped before the Gudi is erected and Vishnu is worshiped after the Gudi is erected.

When Gudi Padva is erected, everyone in the house comes together. Everyone is dressed in nice traditional attire. The house has a sweet meal. Especially Shrikhand Puri or Puranpoli are the two dishes that are especially seen in the meal. Guests come to Soyare and enjoy a family meal together.

Marathi, Konkani, Kannada and Telugu speaking communities celebrate Gudipadva. Sindhi people also celebrate Chetichand on this day to welcome the new year. In Karnataka and Andhra Pradesh, the states ruled by Gautamiputra, it is customary to celebrate this day under different names, Padvo and Ugadi, to celebrate independence.

Since festivals, celebrations and vratas have a spiritual basis, they create consciousness while they are being celebrated.

Since the New Year's cycle, which begins on Gudipadva, is associated with the origin of the universe, the universe is burdened with new consciousness. In contrast, the New Year's cycle, which begins at 12 midnight on December 31, is associated with the rhythm of the universe. The New Year, which begins on Gudipadva, can be compared to the glorious day when the sun rises. The New Year, which begins at 12 midnight on December 31, can be compared to the Tamoguni night that begins after sunset. Things done according to the laws of nature are complementary to human beings, while things done against them are harmful to human beings.

Categories
Read more